सध्या चिंता करण्याची आवश्यकता नाही", राजेश टोपे

 ओमायक्रॉन आणि त्यासोबत आलेली करोनाची तिसरी लाट सगळ्यांसाठीच चिंतेचा विषय ठरली होती.


या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून नव्याने निर्बंध देखील लागू करण्यात आले होते. मात्र, आता एकीकडे बाधितांची संख्या कमी होऊ लागलेली असल्यामुळे निर्बंध पुन्हा शिथिल करण्याची मागणी होऊ लागली असताना दुसरीकडे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी करोनाबाबत राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. करोनाच्या तिसऱ्या लाटेविषयी माहिती देताना त्यांनी बाधितांची आकडेवारी आणि टक्केवारी देखील सांगितली आहे.

“तिसऱ्या लाटेचा सर्वोच्च बिंदू येऊन गेला आहे असं म्हणता येईल. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर या ठिकाणी अचानक बाधितांची संख्या वाढत होती. ती आता तशी नाही. पण राज्याच्या इतर भागात त्याची संख्या वाढत आहे. ग्रामीण भागातही वाढत आहे. पण सर्वजण ५ ते ७ दिवसांच्या उपचारांवर बरे होत आहेत. त्यामुळे इतर भागात वाढणारी बाधितांची संख्या याबाबत सध्या चिंता करण्याची आवश्यकता नाही", असं राजेश टोपे यावेळी म्हणाले. राज्यात करोनासाठी तयार करण्यात आलेले ९२ ते ९५ टक्के बेड अद्याप रिक्त असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. “फक्त ५ ते ७ टक्केच बेडवर रुग्ण आहेत. आयसीयू, ऑक्सिजनवरचे रुग्ण फारतर एक टक्के आहेत. बहुतेक बाधित होम क्वारंटाईन आहेत. त्यामुळे टास्क फोर्सने मार्गदर्शन करावं, जे निर्बंध आपण लावले आहेत ते किती दिवस ठेवायचे याविषयी मार्गदर्शन मिळालं, तर त्याविषयी लोकांना दिलासा मिळू शकेल”, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. merit casino - Xn--O80B910a26eepc81il5g.online
    It 인카지노 was an online gambling 메리트 카지노 주소 site established by a 제왕카지노 lot of people back then. It is owned and operated by the Gambling Commission and operated by

    उत्तर द्याहटवा

stay connected